गाईने दिला दोन जुळ्या वासरांना जन्म
पूर्णा तालुक्यातील मौजे कळगांव येथील घटना
पूर्णा ( प्रतिनिधी):
तालुक्यातील मौजे कळगांव येथे एका शेतकऱ्याच्या गाईने शुक्रवारी (ता.२१) फेब्रुवारी रोजी दोन जुळ्या वासरांना जन्म दिला असून, सुदैवाने दोन्ही वासरं गो-हे असल्याने मुळे भविष्यात या शेतकऱ्यांना बैलरुपी मदत होणार असल्याने शेतकरी कुंटुबात आनंदाचे वातावरण आहे.
पूर्णा तालूक्यातील कळगाव येथील शेतकरी सुदामराव संभाजी सुर्यवंशी यांच्या गायीने शुक्रवारी २१ रोजी सकाळी सहाच्या दरम्यान दोन जुळ्या लालकंधारी वाणाच्या गोंडस वासरांना जन्म दिला. ही घटना अचंबीत करणारी घडल्याने वासरे पहाण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.दोन्ही पुलींगी वासरं असल्याने भविष्यात संबंधित शेतकऱ्यांची बैलजोडीची चिंता मिटली आहे. शेतीच्या कामासाठी त्यांची मोठी मदत होणार असल्याने हे सुर्यवंशी कुटुंब आनंदित झाले आहे.












