श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
पूर्णा(प्रतिनिधी)
२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन येथील श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्राचार्य डॉ. के राजकुमार यांनी मराठी भाषेत असलेल्या सामर्थ्याची आणि वैविध्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली, अमराठी भाषिक व्यक्तीला देखील मराठी भाषा शिकण्याची इच्छा होते, हे भाषेत असलेल्या सामर्थ्याचे आणि गोडव्याचे उदाहरण आहे हे सप्रमाण समजून सांगितले .याप्रसंगी विद्यार्थी कैलास कदम यांनी कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा.शिरवाडकर यांच्या कवितांचे भित्तीपत्रक बनवले. त्याचे प्रकाशन प्राचार्यांच्या हस्ते झाले, यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ शिवसांब कापसे,डॉ राजीव यशवंते यांची उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमासाठी डॉ संजय दळवी, डॉ विजय पवार, डॉ अजय कुर्हे, डॉ सोमनाथ गुंजकर, डॉ ओंकार चिंचोले, डॉ,शिंदे संदीप, डॉ अंबिका चोंडे, डॉ रेखा पाटील, डॉ वर्षा धुतमल, डॉ वृषाली आंबटंकर,डॉ जे जे,स्वामी , प्रा असोरे सर,यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते