खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांचे विशाल कदम यांनी केले स्वागत
पूर्णा(प्रतिनिधी)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा शिवसेना शिंदे गटाचे लोकप्रिय नेते खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांची नांदेड येथे सदिच्छा भेट घेऊन परभणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने युवा नेते विशाल कदम यांनी स्वागत केले.
खा. डॉ.शिंदे हे सध्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहेत.विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील आ.हेमंत पाटील ,आ. बालाजी कल्याणकर,आ. आनंदराव पाटील बोंढारकर, आ. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या सह परभणी जिल्ह्यातीलही शिवसेनेची नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.परभणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने युवा नेते विशाल कदम यांनी खा.डाॅ. शिंदे यांचं यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत तसेच पक्षसंघटना मजबुतीकरणाबाबत चर्चा केली.यावेळी शिवसेना नेते आनंद भरोसे हे देखील उपस्थित होते.