महापुरुषांना मोठेपण सेवा व समर्पनानेच प्राप्त झाले-भदंत डॉ उपगुप्त महाथेरो
पूर्णा बौद्ध विहारात भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांचा अर्ध शतकिय सेवापुर्ती कार्यक्रम
पूर्णा(प्रतिनिधी)
भारतभुमीत सम्राट अशोक,महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी मानव जातीच्या कल्याणासाठी देशात फार मोठे काम केले.ज्याचे अवशेष आजही पाहायला मिळतात.सम्राट अशोकाने आपल्या हयातीत हजारो विहारे, स्तूप,चैत्य निर्माण केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या करून लोकांच्या शिक्षणा साठी मोठे काम केले.मुंबईला सिध्दार्थ कॉलेज,औरंगाबादला मिलिंद कॉलेज ची इमारत उभी केली,परंतु त्यांनी कधीही आपले नाव कुठेही कोरले नाही.त्यांनी काम करतांना कधीच प्रसिद्धीची हाव केली नाही.हे मोठेपण त्यांना त्यांच्या सेवा आणि समर्पनाने प्राप्त करून दिले.असे विचार भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी मांडले.
डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो यांनी ५मार्च१९७५ रोजीऔरंगाबाद येथे श्रामनेर पब्बजा विधी संपन्न झाला होता.त्या घटनेला पन्नास वर्षे झाल्याने त्यांच्या अर्ध शतकिय सेवापुर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यानिमीत्त कार्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.पुढे बोलताना भदंत उपगुप्त महाथेरो म्हणाले की,थोरांमोठ्यांचा आदर्श आपल्या समोर असताना मी माझ्या पन्नास वर्षाच्या पब्बजा काळात कधीच प्रसिध्दीच्या मागे लागलो नाही. अखंडितपने सेवा करीत राहायची.हेच माझ्या आयुष्याचे ध्येय ठरले आहे.असे भावोद्गार आखिल भारतीय भिक्खु संघाचे कार्याध्यक्ष पूज्य.भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी त्यांच्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.
यावेळी शिष्य भदंत शीलरत्न थेरो,भदंत सुभुती थरो,भदंत रेवतबोधी थेरो,भदंत पय्यावंश आणि भदंत पय्यासार रिपाई नेते प्रकाश कांबळे,.प.पूर्णा चे गटनेते उत्तम खंदारे,माजी नगराध्यक्ष मा. उत्तमराव कदम, नामदेवराव राजभोज, प्रकाश मोरे,एस.बी.आय. चेशाखाधिकारी जोंधळेकाॅम्रेड अशोक कांबळे, अँड .हर्षवर्धन गायकवाड, आदींनी गौरव केला.त्यासह देश विदेशातील बौद्ध भिक्खूनी त्यांना दूरध्वनी वरून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास पूर्णा शहरातील बौद्धउपासक उपासिका महीला मंडळ आदींनी मोठी गर्दी केली होती.












