पूर्णा तालुक्यात शनिवार ठरला अपघात वार

Spread the love

वेगवेगळ्या तीन घटनेत दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी..
पूर्णा /प्रतिनिधी
तालुक्यासाठी शनिवार हा अपघात वार ठरल्याचे दिसून आले. रात्री ८ ते १० वाजण्याच्या सुमारास वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांनी आपला जीव गमवावा लागला आहे. तर या अपघातात दोघे गंभीर जखमी आहेत. जखमीतील एकावर परभणी तर दु-यावर नांदेड येथे उपचार सुरू असल्याचे समजते.
पूर्णा तालुक्यात झिरो फाटा, माटेगांव तसेच कानडखेड येथील बॉम्बे पूलावर येथे शनिवार दि. १९ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास तीन विविध अपघाताच्या घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. पहीली घटना एरंडेश्वर शिवारातील झिरो फाटा येथे रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली .घटनेत एरंडेश्वर येथील तुकाराम बबनराव कदम व रावसाहेब कदम हे दोघे आपल्या दुचाकीवरून झिरोफाटा झिरो फाटा येथे गेले होते. दरम्यान एका हॉटेल समोर ते दोघे उभे असताना त्यांना सांगली हुन नागपूरकडे जाणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक एम.एच/ ४५/०७५२ या वाहनाने जोरदार धडक दिल्याने तुकाराम बबनराव कदम (वय३०) गंभीर जखमी झाले होते त्यांचा परभणी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पूर्णा पोलिसांनी घटनास्थळावरून अपघातग्रस्त वाहनांना ताब्यात घेतले आहे. तर त्याच दिवशी रात्री ८ वाजताच्या सुमारास झिरोफाटा-पूर्णा रस्त्यावरील माटेगांव शिवारात दुचाकी व एका पिक अपची जोरदार धडक झाली यामध्ये दुचाकी एम. एच/२२/ ए वाय/८७१७ वरून जात असलेले पिंपळगाव येथील भोजाजी बनसोडे हे पिकप ने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना डोक्याला व छातीत जबर मार लागल्याने त्यांच्यावर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्यास समजते. तर तालुक्यातील पूर्णा- ताडकळस रस्त्यावरील कानडखेड शिवारातील बॉम्बे पुलाच्या चढावर हिंगोली जिल्ह्यातील दोघेजण शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास आपली दुचाकी क्रमांक एम. एच /३८/७९०६ वरुन जात असताना पुलाच्या चढावरुन समोरून आलेल्या वाहनाच्या उजेडामुळे त्या दुचाकी स्वरांची दुचाकी पुलाच्या कठड्याला जाऊन आदळली. यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते जखमी दोघांपैकी एका जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खबर आहे.परंतु त्यांचे नावे काही समजू शकली नाहीत. एकाच रात्री तीन ठिकाणी वेगवेगळे अपघात झाल्याने त्यातच रात्री पाऊस सुरू असल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ झाली. परंतु पोलीस निरीक्षक विलास गोबाडे , जमादार श्याम काळे, जमादार मुजमुले,पोका.मुंजा पवार,पो.का मंगेश जुकटे, आदींनी घटनास्थळ गाठून क्षतीग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहेत.तर एरंडेश्वर येथील तसेच माटेगाव येथील अपघातातील एक आयशर व एक पिकअपसह त्यातील वाहनचालकांना पूर्णा पोलिसांनी ताब्यात घेतली असून सायंकाळी उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे समजते.

You cannot copy content of this page