महाबोधी महाविहारतुन अबौद्ध विश्वस्तांना हटवण्यासाठी पूर्णेत एक दिवसीय धरणे
पूर्णा(प्रतिनिधी)
बुद्धगया बिहार येथील महाविहार व्यवस्थापण समितीतील अबौद्ध विश्वस्तांना हटवून महाबोधी महाविहार व्यवस्थापण बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणी साठी पूर्णेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अ.भा.भिक्खु संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो व भदंत पेयावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली रविवारी ता.९ रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले .
पूर्णा येथे धरणे आंदोलनात भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मूर्म व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनाव्दारे बुद्धगया येथील महाविहाराचे व्यवस्थापण समितीतील अबौद्ध सदस्य हटवून बौद्धांच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार पूर्णेच्या मार्फत देण्यात आले. यावेळी पूर्णेच्या नायब तहसिलदार प्रशांत थारकर व पोलीस निरिक्षक विलास गोबाडे यांनी निवेदन स्विकारले निवेदनावर भदंत डॉ उपगुप्त महाथेरो भदंत पंयावंश रिपाइ नेते प्रकाश कांबळे ,एमयु खंदारे, उत्तमभैया खंदारे, ॲड.हर्षवर्धन गायकवाड, चक्रवर्ती वाघमारे, देवराव खंदारे, दादाराव पंडित,राजु नारायणकर,प्राचार्य डॉ.केशव जोंधळे,अशोक कांबळे शामराव जोगदंड, गौतम दिपके, रौफ कुरेशी, सुनिल मगरे, तुषार गायकवाड, मधूकर गायकवाड, विरेश कसबे,श्रीकांत हिवाळे, दिलीप गायकवाड मुकूंद पाटील शाहीर गौतम कांबळे, त्र्यंबक कांबळे अमृत कऱ्हाळे यांच्या सह पूर्णा शहरातील महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्या च्या स्वाक्षऱ्या आहेत हे आंदोलन दुपारी १२ ते ५ च्या दरम्यान करण्यात आले या आंदोलनात विविध पक्ष संघटना महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यां नी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवला