Purna|गुटख्याचे पोते घेऊन जाणारा दुचाकीस्वार पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात
दुचाकीसह ६० हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात;एकावर गुन्हा दाखल
पूर्णा/प्रतिनिधी
दिवसाढवळ्या दुचाकी वरून गुटख्याची दोन पोते घेऊन जाणाऱ्या एका दुचाकीस्वराला PurnaPoliceपूर्णा पोलिसांच्या पथकाने छापा घालून रंगेहात Arrest पकडत त्याचेकडील गुटख्यासह सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याला जेरबंद केले आहे.ही छापेमारी मंगळवार दि.२२ ऑक्टोंबर रोजी साडेतीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पूर्णा पोलीस स्थानकात एका जणांविरुद्ध FiRगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पूर्णा तालुक्यात Govशासनाने प्रतिबंधित केलेल्या Gutakhaगुटख्याची तस्करी रोखण्यासाठी पूर्णा पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे मागील महिनाभरात पोलिसांनी ही तिसरी कारवाई केली आहे. Police Inspectorपो.नि.विलास गोबाडे यांना पूर्णा शहरात पांगरा ढोणे ते पुर्णा हया रस्त्यावरुन एक काळया रंगाच्या एच.एफ डिलक्स मोटार सायकलवर पाठी मागे दोरीने दोन पोते बांधुन त्यामध्ये गुटखा घेवुन एक इसम पुर्णा कडे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यावरुन त्यांनी तातडीने पूर्णा स्थानकाचे फौजदार पडलवार, जमादार साहेब उर्फ अण्णा माने बाईनवाड, जमादार श्याम काळे,पोकाॅ. मंगेश जुकटे, संदीप चौरे आदींच्या पथकाला शहरातील क्रांती नगर भागात पाठवले पथकाने उडान पुलाच्या खाली वळणावर सापळा लावला दुपारी ३;३० वाजण्याच्या सुमारास एक इसम एम.एच.३८/टी/६८८४ वरुन आला असता त्यास पकडले.पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळ असलेल्या दोन पोत्यांची तपासणी केली.तपासणीत पोलीस पथकाला शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. पोलिसांनी सदरीलिसमास ताब्यात घेऊन त्याच्या दुसाकी व प्रतिबंधित गुटक्यासह त्याला पूर्णा स्थानकात आणले. यावेळी त्याची चौकशी केली असता तो पूर्णा तालुक्यातील खुजडा येथील दीपक हरिभाऊ भाकरे असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी स्थानकात जप्त केलेला त्याची मोजणी केली असता गोवा राजनिवास विमल व्ही आय, तसेच जाफराने पत्ती असा सुमारे ३० हजार रुपयांचा गुटखा तसेच जुनी वापरातील ३० हजार रुपये किमतीची दुचाकी असा मुद्देमाल जप्त करून पूर्णा पोलीस स्थानकात दिपक भाकरे याचे विरुद्ध जमादार अण्णा माने बाईनवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम१२३,२२३,२७४,२७५, तसेच अन्नसुरक्षा व माणके अधिनियम २००६ प्रमाणे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पूर्ण पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.