पूर्णेत शांतता समितीची बैठक संपन्न

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

आगामी रमजान ईद, व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पोलिस विभागाच्या वतीने गुरुवारी २७ रोजी पालीकेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात शांतता समीतीच्या बैठकीचे आयोजन केले होते.

शांतता समीतीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष उत्तमरावजी कदम ,मंचावर मार्गदर्शक उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील, पोलिस निरीक्षक विलास गोबाडे,सहा.पो.नि.सोमेश्वर शिंदे,शहरातील व्यापारी,राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार, तालुक्यातील पोलिस पाटील,आदींची उपस्थिती होती.यावेळी आगामी काळात साज-या होणा-या रमजान ईद तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपायोजनाचा आढावा घेण्यात आला. डॉ.समाधान पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.शांतता समीतीच्या सदस्यांनी आप आपली मतं व्यक्त केली.बैठकीस महसूल,महावितरण, सा.बा.विभाग,पालीका, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचे दिसुन आले.बैठकीचे प्रस्तावित पो.नि.गोबाडे यांनी केले.सुत्रसंचलन जगदीश जोगदंड तर आभार सपोनि.शिंदे यांनी केले.बैठक यशस्वीतेसाठी पोहेकाॅ.जाधव,पोकाॅ.लांडगेवाड यांनी परिश्रम घेतले.यानंतर डॉ समाधान पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांनी आपल्या कुमकचे शक्ती प्रदर्शन करत शहरात रुटमार्च काढला.

You cannot copy content of this page