पूर्णेत भौतिकशास्त्राची विद्यापीठस्तरीय कार्यशाळा संपन्न.
पूर्णा(प्रतिनिधी)…
येथिल श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्तविद्यमाने दि.26 एप्रिल 2025 रोजी महाविद्यालयात NEP 2020 नुसार बी.एस्सी द्वितीय वर्षाच्या भौतिकशास्त्र या विषयाच्या विद्यापीठस्तरीय एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे करण्यात आले होते.
आयोजित कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री डॉ.गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची उपस्थिती होती तर कार्यशाळेचे उदघाटक प्रो.डॉ. अशोक महाजन, प्र- कुलगुरू, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोदअण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम ,सहसचिव, प्रा. गोविंदराव कदम, उत्तमरावजी कदम कोषाध्यक्ष, उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहूणे म्हणून प्रो.एम.के.पाटील,डीन, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्वा.रा.तीर्थ. विद्यापीठ, नांदेड यांची प्रमुख उपस्थिती होती .तसेंच कार्यशाळेसाठी भौतिकशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष: प्रो. के. एस. कणसे,हे उपस्थित होते. आणि भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे आठ सदस्यांची उपस्थिती होती.चर्चासत्राचे प्रास्ताविक करताना डॉ.के. एस. कणसे यांनी म्हटले की, विषयाचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणारा व रोजगाराभिमुख असावा. तसेच विषयाचे सदस्य डॉ.के. शेट्टी सर यांनी चर्चा सत्रात पेपर नुसार योग्य वाचन करून ठराविक बदल करण्यात येतील असे सुचविले. यावेळी प्र.कुलगुरू अशोक महाजन व
डॉ. एम. के. पाटील यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.या कार्यशाळेचा अध्यक्षीय समारोप संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री डॉ.गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केला. या कार्यशाळेत विद्यापीठ परिसरातील 52 प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला .कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार कार्यशाळेचे समन्वयक डॉ. गंगाधर कापुरे यांनी केले. या कार्यशाळेसाठी डॉ.शेख आर.एस.,डॉ. बी.बी. मुसळे, डॉ. राख आर.आर., डॉ. डी.सी.कमठणे, डॉ. दिशा मोरे, प्रा. अनिकेत शिंदे व महाविद्यालयातील शिक्षक , शिक्षेकेत्तर कर्मच्यारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.