Parbhaniपरभणी जिल्हा चार विधानसभेत १४४ नामनिर्देशन पत्रांची विक्री
आ.बाबाजानी दुर्राणींनी भरला अपक्ष उमेदवारी अर्जाने चर्चेला उधाण; पाथरी,परभणी,जिंतुरात प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल
पूर्णा/प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील जिंतुर, गंगाखेड पाथरी,परभणी या चार विधानसभा मतदार संघात तब्बल ७४ उमेदवारांनी १४४ नामनिर्देशन पत्र विकत घेतली असून, नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहील्याच दिवशी मंगळवारी २२ आक्टोंबर रोजी पाथरी, जिंतूर व परभणीत असे प्रत्येकी एका उमेदवाराने ३ नामनिर्देशन पत्र केले दाखल केले असल्याची माहिती परभणी जिल्हा मुख्य निवडणूक अधिका-यांनी दिली आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी विधानसभेच्या जागेसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने एकच चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. परभणी जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत अर्ज विक्री तसेच नामनिर्देशन पत्र स्विकारण्याची प्रक्रीया सुरू आहे.आज मंगळवार, दि २२ ऑक्टोबर रोजी चार विधानसभेसाठी ७४ उमेदवारांनी तब्बल १४४ उमेदवारी अर्ज खरेदी केल्याची माहिती आहे.जिंतूर विधानसभा मतदारसंघात १८ उमेदवारांनी ३५ तर परभणी विधानसभा मतदारसंघात २१ उमेदवारांनी ३०अर्ज तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघ१७ उमेदवारांनी २७ अर्ज घेतले.तसेच पाथरी विधानसभा मतदारसंघात १८उमेदवारांनी ५२ अर्ज घेतले आहेत.
पाथरी येथून आ.बाबाजाणी दुर्राणी यांच्यासह जिंतूर व परभणी येथील दोघांचे उमेदवार अर्ज दाखल..
९८-पाथरी विधानसभेसाठी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष तर ९५-जिंतूर येथे बहुजन रिपब्लीकन सोशलीस्ट पार्टीच्या वतीने दिनकर धारोजी गायकवाड आणी ९६-परभणी मतदार संघात अ. पाशा अ. गफ्फार खुरेशी यांनी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीच्या वतीने आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.

परभणी जिल्हा