गंगाखेडच्या भस्मासुराचा नायनाट करण्याची योग्य वेळ-शिवसेना उपनेते खा.संजय जाधव
विधानसभेची रणधुमाळी;विशाल जनसमुदायाच्या साक्षीने मविआच्या विशाल कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल;खा.जाधवांचे विद्यमान आमदार गुट्टेंवर जोरदार टिकास्त्र..
पूर्णा/प्रतिनिधी
गंगाखेड विधानसभा मतदारसंघांत
आ.डॉ.रत्नाकर गुट्टे हे भस्मासुर आहेत.त्यांनी साखर कारखाना काढण्याच्या नावाखाली अनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा टाकून तब्बल ५ हजार कोटींची माया जमवली आहे. यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघात लोकांच्या जमिनीवर कब्जे करणे, ओपन स्पेस हडप करणे, दादागिरी करणे अशी कामे हे आमदार करत आहेत. त्यांना जनतेला लुबाडण्याचा भस्म्या झाला आहे.या भस्मासुराचा नायनाट करण्याची हीच ती योग्य वेळ आहे. नागरिकांनो घाबरण्याचे कारण नाही, या भस्मासुराशी लढण्यास आम्ही सक्षम आहोत.यंदाच्या निवडणुकीत या सत्तापिपासू भस्मासुराचा नायनाट करावयाचा आहे, असे आवाहन देखील खा. संजय जाधव यांनी केले.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा), काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून विशाल विजयकुमार कदम यांनी गंगाखेड येथे सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी विशालमय जनसमुदायाच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी सजवलेल्या रथातून शहरातील चिंतामणी मंदिर ,बालाजी मंदिर पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत ही रॅली वाजत गाजत दुपारी उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात धडकली. यावेळी पारपडलेल्या सभेत शिवसेना उपनेते खा.संजय उर्फ बंडू जाधव प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस,राज्यसभा सदस्य,खा. फौजिया खान,माजी आ.विजय गव्हाणे,बाळकाका चौधरी, सुधाकर खराटे,मा.सभापती बालाजी देसाई, गंगाप्रसाद आणेराव, विष्णु मुरकुटे, बाळासाहेब राखे,गंगाखेडचे नगराध्यक्ष विजयकुमार तापडीया,नगराध्यक्ष संतोष एकलारे,या.नगराध्यक्ष जाकीर कुरेशी, राकाॅ.ता.अ.शहाजीराव देसाई, गजानन अंभोरे,प्रा.किरण सोनटक्के, सखुबाई लटपटे, श्रीमती देशमुख, पै.मारोतराव बनसोडे, रमाकांत कुलकर्णी, काशिनाथ काळबांडे, मुंजा कदम,अनिल सातपुते,अॅड. मनोज काकानी,जितेश गोरे,गोविंद जाधव, शेख अहमदभाई,यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शिवसेना उपनेते खा. संजय जाधव यांनी मतदार संघाचे विद्यमान आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागत सडकून टिका केली, तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहनही यावेळी खासदार संजय जाधव यांनी केले.यावेळी मविआच्या उपस्थित नेत्यांसह उमेदवार विशाल कदम यांनीही जनतेला संबोधित केले.यावेळी पालम,पूर्णा, गंगाखेड तालुक्यातील हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
