एम.आय.एमच्या विधानसभा अध्यक्ष प्रा.हबीब यांची उमेदवारी दाखल
गंगाखेड विधानसभा निवडणुक; शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी लगबग
गंगाखेड/प्रतिनिधी
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात निवडणूकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी २९ रोजी एम.आय.एम.पक्षाचे गंगाखेड विधानसभा अध्यक्ष प्रा.शेख.हबीब यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरू आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. मंगळवारी विविध पक्षांच्या प्रतिनीधींनी गंगाखेड तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी केली होती.एम.आय.एम.पक्षाचे गंगाखेड विधानसभा अध्यक्ष प्रा. शेख हबीब सर यांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधे पद्धतीने कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता विधानसभा निवडणुकीचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.अद्याप एम.आय.एम पक्षाने परभणी जिल्ह्यातील कोणत्याही उमेदवाराची घोषणा केली नाही.मी पक्षाच्या वतीने गंगाखेड विधानसभा निवडणुक लढवण्याची तयारी पक्षांच्या वरिष्ठांकडे दर्शवली आहे .पक्ष याबाबत जो निर्णय घेईल त्याचे पालन करणार असल्याचे प्रा.शेख हबीब यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी उमेदवार प्रा. शेख हबीब सर गंगाखेड,तालुका अध्यक्ष वाहज भाई,शेख अझहर भाई, सय्यद मुक्तार. हबीब बागवान, मो. आखिल भाई,रौफ लाला,सय्यद इम्रान आदीं अनेक पधादिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
