अत्याचार प्रकरणातील आरोपीला पुण्यातून अटक
पूर्णा पोलिसांची कारवाई;अल्पवयीन मुलीचे अत्याचार प्रकरण;दीड वर्षापासून फरार होता अत्याचारी
पूर्णा/प्रतिनिधी
एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून दीड वर्षापासून फरार असलेल्या अत्याचार प्रकरणातील एका आरोपीला पूर्णा पोलिसांनी पुणे महानगरातील कोथरुड परिसरातून ताब्यात घेऊन बेड्या ठोकून जेरबंद केले आहे. ही कारवाई सोमवार दि.२८ रोजी करण्यात आली. सदर आरोपीला पूर्णा पोलीसांनी मा.पूर्णा न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आनंद गंगाधर दमाने असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.या बाबत अधिक माहिती अशी की,दमानेने दिड वर्षांपूर्वी तालुक्यातील देगांव येथिल एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तीला पळवून नेत वारंवार लैंगिक अत्याचार केले होते.या प्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात त्याचे विरोधात २७ मार्च २०२३ रोजी गुरनं ६६/२०२३ कलम ३७६ बाल लैंगिक अत्याचार कलम पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल होताच आरोपी आनंद दमाने हा पसार झाला होता.त्याच्या शोध पोलिस घेत होते.परंतु त्याचा काही केल्या तपास लागत नव्हता.पूर्णा उप विभागाचे पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पो.नि.विलास गोबाडे यांनी आपल्या नेतृत्वाखाली सपोनी. नांदगावकर,पोकाॅ.टाकरस,पोकाॅ.सानप यांचे एक विशेष पथक स्थापन केले.या पथकाने मागील काही दिवसांत तपास करत आरोपी आनंद दमाने हा पुणे महानगरातील कोथरुड येथिल एका गॅरेज मध्ये निवासास राहुन काम करत असल्याचे निष्पन्न केले.सदरील पथकाने दि.२८ रोजी तातडीने पुणे महानगर गाठून दमाने यास ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. दरम्यान त्याने पोलीसांना झुगारा देत पलायन करण्याचा प्रयत्नही केला मात्र यावेळी त्याचा प्रयत्न फसला तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलीसांनी त्यास पुणे येथून ताब्यात घेऊन पूर्णा पोलिस ठाण्यात आणले त्यास या.पूर्णा न्यायालया समोर हजर केले.यावेळी न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.प्रकरणी पुढील तपास पो.नि. गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नांदगावकर हे करत आहेत.