गंगाखेड मतदार संघात शक्तीप्रदर्शनाविना मनसेचा उमेदवारी अर्ज
मनसेचे रुपेश सोनटक्के(देशमुख) निवडणूक रिंगणात..!
पूर्णा/प्रतिनिधी
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदार संघात मविआ,महायुती,वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार रुपेश मनोहर सोनटक्के (देशमुख) यांनी मात्र उमेदवारी दाखल करण्यासाठी कोणताही गाजावाजा न करत अत्यंत सध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मनसेच्या वतीने गंगाखेड विधानसभा मतदार संघात रुपेश सोनटक्के (देशमुख) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.अर्ज भरण्याच्या अखेच्या दिवशी मनसे कडून कोणत्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन करण्यात आले नाही.येथिल सहा निवडणूक अधिकारी यांच्या दालनात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार रुपेश सोनटक्के यांच्यासह,यादव महात्मे,राहुल डोंगरे, गोविंद राज ठाकर,अनिल बुचाले, बापूराव पेदमपल्ली,गजानन भुसणर पंकज राठोड,राहुल चव्हाण,यांची प्रमुख उपस्थिती.दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विविध पक्षांचे उमेदवार हजारोंचा जनसमुदाय गोळा करून मोठ्या जल्लोषात रॅली काढत आहे.मात्र या सर्व गोष्टींना फाटा देऊन मनसेने मात्र अत्यंत साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ट्रेण्ड सुरू केला आहे.