धनशक्ती विरुद्धच्या लढ्यात मतदारांनो साथ द्या-विशाल कदम
गंगाखेड विधानसभेची रणधुमाळी)पूर्णा तालुका;मविआचे विशाल कदम यांचा प्रचार दौरा
पूर्णा/तालुका
यंदाची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे.याधनशक्तीच्या लढ्यात मतदारांनो साथ द्या, जनतेचे कोणतेही काम असो ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत रहाणार मतदार संघाचा विकास कामांचा डोंगर उभारणार,माझे व मविआचे हात बळकट करण्यासाठी मतदार मायबाप जनतेने मतदानरुपी शक्ती माझ्या पाठीशी उभी करावी.तुमच्या गावाच्या विकासाची लढाई लढण्यासाठी सदैव तत्पर राहिन असे प्रतिपादन गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार विशाल कदम यांनी केले आहे.
गंगाखेड विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला मंगळवार दि.५ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे. तत्पुर्वी महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाचे अधिकृत उमेदवार विशाल विजयकुमार कदम यांनी मतदार संघात प्रचाराची आघाडी घेतली असून, प्रचारापुर्वीच त्यांनी पूर्णा,पालम, गंगाखेड,शहर व तालुक्यात दौरा करून मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या आहेत. निवडणुकीच्या उमेवारी दाखल करणे माघारी घेण्याच्या प्रक्रियेनंतर राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.मात्र मविआचे उमेदवार विशाल कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मतदार संघात पुन्हा प्रचार दौरा सुरू केला आहे.मंगळवारी ५ रोजी उमेदवार विशाल कदम हे गौर सर्कल मधील गौर, कंठेश्वर,,आदीं गावात दौऱ्यावर होते.यावेळी त्यांचे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.प्रसंगी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे रितेश काळे,ता.अ.शहाजी देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख काशिनाथ काळबांडे, अच्युत पारवे,श्रीधर पारवे, रमेश ठाकूर, बालाजी वैद्य,नवनाथ पारवे,संजय कदम, विठ्ठल कदम,गणेश जोगदंड, आशिष जोगदंड,तुकाराम पारवे,विलास जोगदंड यांच्यासह अनेक तरुण व ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.
या प्रचार दौऱ्यात विशाल कदम यांनी ही विधानसभा निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे.मी एक सामान्य कार्यकर्ता असून गावपातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी जीवाचे रान करील,असा विश्वास आपणास देतो.मशाल या निवडणूक चिन्ह समोरील बटण दाबून मतदानाचा आशीर्वाद द्या,असे आवाहन त्यांनी केले.
