कपीलधारकडे जाणाऱ्या पदयात्रेचे पूर्णेत जंगी स्वागत…

Spread the love

फटाक्यांची आतिषबाजी, टाळमृदंगाच्या गजरात भव्य शोभायात्रा;शहरात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत..

पूर्णा/ प्रतिनीधी
हिंगोली जिल्ह्यातील लासिनमठ संस्थान वसमत येथील श्रीक्षेत्र कपिलधारकडे जाणा-या पदयात्रेचे  आज गुरूवार दि.७ नोव्हेंबर रोजी सकाळी पुर्णा शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीसह रांगोळ्यांची आरास करीत जंगी स्वागत करण्यात आले यावेळी भाविकांनी शहरात पदयात्रेची भव्य शोभायात्रा काढली.
            प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील लासिनमठ संस्थान च्या वतीने श्री.ष.ब्र.१०८ करबसव शिवाचार्य महाराज वसमतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत ते कपीलधार पदयात्रा काढण्यात येते याही वर्षी गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही पदयात्रा एकलारे पेट्रोल पंप येथे सर्व यात्रेकरूंचे एकलारे कुटुंबीयांय व विरशैव समाजाच्या वतीने जंगी  स्वागत करण्यात आले. येथे चहा व जलपान कार्यक्रम झाल्यानंतर पदयात्रा पुर्णा शहरात ढोल ताशा टाळ मृदंगाच्या गजरात, गुरुराज माऊलीच्या गजरात पावली खेळत भव्य मिरवणूक काढण्यात आली. पदयात्रेला पुर्णा शहरात मुख्य रस्त्यावर रांगोळ्या काढून फटाके फोडुन भव्य आतिषबाजीसह हार फुलांनी स्वागत करून बाजार पेठेत भाविकांनी दिंडीचे स्वागत केले. पदयात्रा दिंडी प्रमुख शिराळे गुरुजी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर पदयात्रा श्री गुरु बुद्धी स्वामी मठ संस्थान येथे समस्थ विरशैव समाजातर्फे अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.या दिंडीचे स्वागतासाठी प्रामुख्याने व्यापारी , राजकीय, सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिंडीचे स्वागत केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गुरु बुद्धी स्वामी यात्रा उत्सव समितीच्या वतीने  कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.या कार्यक्रमा नंतर दिंडी दुपारी पुर्णा तालुक्यातील खुजडा येथे दुपारच्या विसाव्यासाठी थांबणार आहे.खुजडा ग्रामस्थां तर्फे दुपारी पदयात्रेकरुंसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.त्या नंतर व ताडकळस येथिल ग्रामस्थांच्या वतीने ही स्वागत व चहापान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.पदयात्रा सायंकाळी फुरकळस येथे मुक्कामी होती.  यांचे प्रवचन झाले फुरकळस वासियांनी महाप्रसादाचे मनोभावे आयोजन केले. आज सकाळी पदयात्रा शुक्रवारी ९ रोजी श्रीक्षेत्र कपिलधारच्या दिशेने मार्गस्थ झाली.

You cannot copy content of this page