विशाल कदमांच्या प्रचारासाठी रुपाली कदम मैदानात

Spread the love

गंगाखेड मतदार संघात उमेदवार पतीच्या प्रचारासाठ सौभाग्यवती
गावोगावी मतदारांच्या भेटीगाठी, प्रचारपत्रकांचे वाटप, घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद…

पूर्णा/ प्रतिनिधी गंगाखेड मतदार संघातील काँग्रेस, शरदपवारांची राष्ट्रवादी,मित्र पक्ष, शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल कदमांच्या सौभाग्यवती रुपालीताई कदम ह्या,ननंदबाई, जाऊबाई आदीं  कुटुंबीय ,महीला आघाडीतील पदाधिका-यांना सोबतीला घेऊन प्रचारात उतरल्या आहेत. गावोगावी भेटीगाठी,पक्षाचा झेंडा घेऊन घोषणा देणाऱ्या ते प्रचारपत्रकांच्या वाटपापर्यंतच्या कामात मविआचे उमेदवार विशाल कदम  यांचा प्रचार सुरू केला आहे.या महिलांमंडळाने गेल्या दोन दिवसांत मतदार संघातील पूर्णा व पालम तालुक्यातील माटेगांव ,एरंडेश्वर आहेरवाडी ,कावलगांव सातेफळ, पेनुर, ईसाद ,राणीसावरगांव, खंडाळी पिंपळगाव ( बा)कौडगांव ,वाडी,धानोरा मोत्या, वडगाव,आलेगांव सुरवाडी, आदीं  गावांचा झंझावती दौरा केला आहे.यावेळी प्रचारात महिला कार्यकर्र्त्यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. पुरुष उमेदवारांच्या प्रचारातही त्यांच्या बरोबरीने महिला उतरल्या आहेत. प्रचारात सहभागी झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी  ‘ विशालराव कदम यांना मत द्या’, असे आवाहन गावो गावांमध्ये जाऊन करत आहेत. मतदारांच्या भेटीगाठी, प्रचारपत्रकांचे वाटप, घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला आहे. प्रचारात मविआचे उमेदवार विशाल कदम यांच्या सौभाग्यवती रुपालीताई कदम, बहीणाबाई वैशालीताई साळुंके, भावजय शिल्पाताई कदम, शिवसेना महीला आघाडीच्या नेत्यां मा.नगरसेविका विजयाताई कापसे, सरपंच रुक्मिणीबाई बोकारे,सारिकाताई कदम ,मिराताई कदम ,छाया बरदाळे,स्मिता कदम,  ज्योती साबणे,दिपा कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. सोशल मीडियावर देखील महिलांनी सुरू केलेल्या प्रचाराची एक चर्चा मतदारसंघात रंगली आहे.शिवाय महिला सोशल मीडियावरील प्रचाराची धुराही काही महिला कार्यकर्त्या सांभाळत आहेत. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम अकाउंटवरील अपडेट हाताळण्याचे काम त्या करत आहेत. याबरोबरच रोजच्या प्रचाराची क्षणचित्रेही वेगळ्या धाटणीत  मांडण्यात येत आहेत

You cannot copy content of this page