परभणीत शनिवारी उद्धवजी ठाकरे यांची जाहीर सभा
परभणी/प्रतिनिधी
जिल्ह्यातील परभणी व गंगाखेड विधानसभामतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार आ. डॉ.राहुल पाटील तसेच गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची शनिवार दि. ८ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेला खा.संजय जाधव, यांच्या सह जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट,शिवसेना ठाकरे गट व मित्र पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड,जिंतूर पाथरी,परभणी येथे नुकतीच प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे जिल्ह्यातील महाविकास आघाडीची आक्रमक प्रचार यंत्रणा यामुळे चांगलेच तापल्याचे दिसत आहे.प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी परभणीत युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे,तर जिंतुर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी हजेरी लावली होती.आणी आता जिल्ह्यातील मविआच्या उमेदवारांसाठी शनिवार दि.८ रोजी सायं ६ वाजता जिंतूर रोड येथील महात्मा फुले हायस्कूल मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेला जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट ,शिवसेना ठाकरे गट आणि मित्र पक्षाचे नेते पदाधिकारी यांचेसह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे चारही विधानसभा मतदारसंघातील उमेदवार उपस्थित राहणार आहेत. तरी या सभेला लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
—————————————————————–
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांच्यासाठी परभणी जाहीर सभा घेऊन भर सभेत त्यांना लहान भाऊ म्हणून संबोधले मात्र रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या शिट्टीचा आवाज काही परभणी करांनी घुमवू दिलाच नाही. महायुतीने लोकसभेला जाणकरांसाठी ऐनवेळी केलेली कसरत कामी आली नव्हती.लोकसभा निवडणूकी प्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील गंगाखेड मध्ये महायुतीतुन बाहेर पडलेल्या रासपच्या आ.डॉ. गुट्टेंना भाजप व मित्र पक्षाचा विरोध डावलून त्यांना अखेरच्या क्षणी पुरस्कृत उमेदवारी देऊ केली.महायुतीने केलेली ही कसरत किती फायद्याची ठरली हे अवघ्या काही दिवसांनंतर स्पष्ट होईलच. निवडणुका म्हटलं की,परभणीत ठाकरेंची सभा आणि सभेनंतर उमेदवारांचा निश्चित विजय हे समीकरण यापुढेही परभणीकर कायम राहणार का त्यांचे शिलेदार विधानसभेकडे कुच करणार अशी चर्चा रंगली आहे