पोलीस अधीक्षकांनी केली संवेदनशील मतदान केंद्रांची पाहणी

Spread the love

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्णेतील मतदान केंद्रांना दिल्या भेटी

पूर्णा/ प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दि.८ नोव्हेंबर शुक्रवार रोजी पूर्णा शहरातील संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.
   जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी मुक्तपणे भयमुक्त वातावरणात मतदानासाठी घराबाहेर पडावे, यासाठी पोलीस प्रशासन सरसवले असून ,पूर्णा शहरातील  डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर व महादेव मंदिर येथील जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्र तसेच तालुक्यातील चुडावा पोलिस ठाण्याचे हद्दीतील चुडावा जि.प.शाळा तसेच धनगरटाकळी जि.प.शाळा हे चार मतदान केंद्र संवेदनशील मानले जातात.त्या अनुषंगाने शुक्रवार दि.८ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी हे या मतदान केंद्रांना भेटी देण्यासाठी आले होते.त्यांनी पूर्णा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील जिल्हा परिषद शाळा  तसेच महादेव मंदिर येथिल जिल्हा परिषद शाळातील  संवेद्यशील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला काही सूचनाही दिल्या आहेत.मतदान केंद्राच्या आसपास कायद्याची वचक राहावी यासाठी संवेदनशील मतदान केंद्र तसेच हद्दीतील सर्व मतदान केंद्राबाहेर विशेष पोलीस बंदोबस्त नियुक्त करावा संवेदनशील मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी. भय मुक्त वातावरणामध्ये निवडणुकीची मतदान प्रक्रिया राबवण्यात यावी अशा सूचना पो.अ.परदेशी यांनी दिल्या आहेत.
यावेळी त्यांच्यासोबत पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. समाधान पाटील पोलीस निरीक्षक विलास गोबाडे जमादार  सपोउपनि अण्णा माने आयांची उपस्थिती होती.

You cannot copy content of this page