चारचाकी वाहनातील ३० लाखांची रोकड गंगाखेड पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

गंगाखेड शहरातील घटना; मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

गंगाखेड:
शहरातील डाॅक्टर लाईन परिसरात गंगाखेड पोलीसांनी  एका चारचाकी वाहनातून जाणारी ३० लाख रुपयांची रोकड जप्त केल्याची घटना सोमवार (दि.११) नोव्हेंबर रोजी  घडल्याचे उघडकीस आले आहे.सदरील चार चाकीही नांदेड जिल्ह्यांतील असल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी सदरील वाहनास ३० लाखांच्या रोकड सह ताब्यात घेत पुढील तपासणी सुरू केली आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे.अनेक ठिकाणी निवडणुकीत पैसा वाटपासाठी पैशाची खाजगी वाहनातून ने-आण होत आहे.गंगाखेड मतदार संघात आचार संहिता पथक तसेच पोलिस विभागाचे कर्मचारी गस्तीवर आहे.सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गंगाखेड शहरातील डाॅक्टरलेन भागात सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर, डि.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक असद शेख, पोलीस शिपाई परसराम परचेवाड, राम पडघन आदींचे पथक शहरात गस्तीवर होते.दरम्यान पथकातील कर्मचा-यांनी नांदेड जिल्ह्यांतील नंबर प्लेट असलेल्या एका चार चाकी वाहनाची तपासणी केली असता पथकास वाहनात ५०० रुपये दराच्या नोटांचे ६० बंडल रुपये तीस लाख रुपये रोख रक्कम आढळून आली.पोलीसांनी वाहनातील दोघांना वाहनांसह ताब्यात घेऊन गंगाखेड पोलिस ठाण्यात तपासणी, पुढील कार्यवाही करीता आणले असल्याचे समजते.याबाबतची माहिती निवडणूक विभाग व एफ.एस.टी. पथकाला दिली. एफ.एस.टी. पथक प्रमुख समाधान पवार, ग्रामसेवक राहुल रेंगे, पो. शि. नलबले, फोटोग्राफर मुरकुटे, शासकीय पंच महादेव काडवदे, अविनाश राठोड यांच्या समक्ष वाहनाची झडती घेतली.एवढ्या मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहनात ३० लक्ष रुपयांची रोकड मिळून आल्याने शहरात मात्र चांगलीच खळबळ उडाली होती.

You cannot copy content of this page