शेतकऱ्यांना लुटणाऱ्याला गंगाखेड मधून हद्दपार करा-मा.आ.सुरेशदादा देशमुख
गंगाखेड निवडणूक रणधुमाळी; विशाल कदम यांच्या प्रचारार्थ पूर्णा तालुक्यातील गौर,कावलगांव ,चुडावा, ताडकळस संवाद सभा
ताडकळस( प्रतिनिधी)
परळीच्या एका महाभागाने शेतकऱ्याच्या नावावर विविध बँकातून परस्पर कोट्यावधी रुपयांचे कर्ज काढून तेच पैसे निवडणुकीत तो आज उजागरपणे वाटत असेल .तर मतदार संघातील जनतेने त्याचे पैसे विना दिक्कत घ्यावेत मात्र मतदान हे मतदार संघातील भूमिपुत्र विशाल कदम यांनाच करावे असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश दादा देशमुख यांनी केले.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कदम विशाल विजयकुमार यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी पूर्णा तालुक्यातील कावलगाव चुडावा गौर ताडकळस येथेमहाविकास आघाडीच्या संवाद सभा पार पडल्या. या संवाद सभेसाठी शिवसेना उपनेते खासदार संजय उर्फ बंडू जाधव , काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश दादा देशमुख, काँग्रेसचे नेते सायखेडा कारखान्याचे चेअरमन अभिजीत देशमुख, रामनारायणजी मुंदडा, बालाजीराव देसाई, रितेश काळे, शहाजीराव देसाई, रंगनाथराव भोसले माणिकराव हजारे, गजानन आंबोरे ,संजय कलारे, काशिनाथ काळबांडे, प्रल्हादराव पारवे, हरिभाऊ डाके, गजानन कदम ,विशाल भोसले, फिरोज पठाण ,नंदकिशोर मुंदडा ,व्यंकटराव पोळ, बबलू माने, गजानन शिराळे पंडितराव जाधव, अनिल नरवटे, व्यंकटेश पवार आदीं मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना मा.आ. देशमुख यांनी गंगाखेडचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कारभारावर व महायुतीच्या शेतकरी, शेतमजूर तरुण, महिला विरोधी धोरणावर सडकून टीका केली.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश मगरे यांनी तर आभार प्रदर्शन गोपाळ अंभोरे यांनी केले.
यंदाचे मतदान तुमचं पुढील ५ वर्षाचे भविष्य ठरवणारं
२० तारखेला तुम्ही करणारे मतदान हे तुमचे पुढील ५ वर्षाचे भविष्य ठरवणारे आहे.त्यामुळे सर्वसामान्यांचे भले करणा-या विशाल कदम मतदान करून बहुमताने विजयी करा असे आवाहन काँग्रेसचे नेते सायखेडा कारखान्याचे चेअरमन अभिजीत देशमुख यांनी केले.
…
शेतकरी पुत्राला विधानसभेत पाठवा – खा.संजय जाधव
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोनदा विशाल कदम यांच्या माध्यमातून शेतकरी पुत्राला उमेदवारी दिली असून विधानसभेत शेतकऱ्यांचा आवाज बनण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल कदम यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन शिवसेना उपनेते खा.संजय जाधव यांनी ताडकळस येथील जाहीर सभेत केले.