शेतकऱ्यांनो सावधान; शेतातील मोटारीचे स्टार्टरची होतेय चोरी

Spread the love

पूर्णा तालुक्यात स्टार्टर चोर सक्रिय;हटकरवाडी-खुजडा शिवारातून १५ हजारांचा स्टार्टर पळवला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

पूर्णा(प्रतिनिधी)

तालुक्यातील शेतकऱ्यांनो सावधान असा सध्या तालुक्यात शेत आखाड्यावरील विहीर ,बोअरवेलच्या मोटारीचे स्टार्टर पळवून नेणारी चोरट्यांची टोळी सक्रिय झाली असून, पूर्णा तालुक्यातील हटकरवाडी खुजडा शिवारातून एका शेतकऱ्याच्या बोअरवेल मोटारीचे १५ हजार रुपये किंमतीचे स्टार्टर चोरट्याने पळवल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात दि.२५ नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा शहरासह तालुक्यात भुरट्या चोरट्याचे टोळकं सक्रिय झाले आहे.शहरातील आनंद नगर भागात दोन मंदीराच्या दानपेटीलसह तीन ठिकाणी बंद घराला चोरट्यानी लक्ष बनवून चोरी केल्याची घटना मागील पंधरा दिवसात घडली आहे.तर शहरासह तालुक्यातील अनेक गावांतून दुचाकी चोरीला जात आहेत त्यातच चोरट्यानी नवा फंडा वापरत आता आपला मोर्चा शेत आखाड्यावरील स्टार्टर चोरी कडे वळवला असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील मौजे हटकरवाडी येथिल एका शेतकऱ्याच्या शेतातून मोटारीचे स्टार्टर चोरीला गेला आहे.शेतकरी विठठल अरूण सदगर वय ३५ वर्षे, यांची परिसरातील हटकरवाडी- खुजडा शिवारातील गट क्रमांक ६७ मध्ये सुमारे ओलीताखालील ३ हेक्टर शेतजमीन आहे. शेतात बोअरवेल असुन त्यास मोटार व स्टार्टर बसवलेलं आहे. ते हटकरवाडी येथे आपल्या कुटुबांसह राहातात दि.२२ नोव्हेंबर रोजी विठ्ठल सदगर त्यांची आई, वडिल यांनी शेताचे काम केले व संध्या ७ वा. सर्वजन आमचे घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वा. त्यांचे वडिल शेतात भाजीपाल्याला पाणी देण्यासाठी गेले असता. त्यांना शेतातील बोअरवेल जवळ १५ हजार रुपये किंमतीचे लावलेले स्टार्टर दिसले नाही. तेव्हा त्यांनी आजुबाजुला पाहीले परंतु स्टार्टर न मिळाल्याने ते कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले असल्याचे लक्षात येताच त्यांनी पूर्णा पोलिस ठाणे गाठून तक्रार एक दाखल केली. या तक्रारीवरून पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास जमादार रमेश मुजमुले करत आहेत.

You cannot copy content of this page