स्नेहसंमेलन;श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात, सांस्कृतिक कार्यक्रमासह मैदानी खेळाचे आयोजन
पूर्णा(प्रतिनिधी)…..
श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा येथे वार्षिक स्नेहसंमेलन २०२४-२५ स्पंदन चे आयोजन ९ ते ११ जानेवारी दरम्यान करण्यात आले असून ,सांस्कृतिक कार्यक्रमासह मैदानी खेळाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
उद्घाटन सत्रात पूर्णापोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोदअण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम, कोषाध्यक्ष उत्तमरावजी कदम, सहसचिव. गोविंदराव कदम यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख युवा वक्ते राहुल गिरी हे विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनात मार्गदर्शन करणार आहेत.वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये क्रीडा स्पर्धा, सांघिक खेळ,चित्रकला, निबंध स्पर्धा, काव्यवाचन, मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा पारंपरिक वेशभूषा, नृत्य स्पर्धा, चालता बोलता, साधे व संगीत शेलापागोटे अशा विविध कलागुणांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश प्राप्त केले त्यांचा सत्कार देखील याप्रसंगी आयोजित करण्यात येणार आहे तरी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के राजकुमार यांनी केले आहे.