पूर्णेच्या आयटीआयचे नांव आता कृषीभूषण स्व.अँड.गंगाधर(दादा) पवार
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा नामविस्तार सोहळा संपन्न
पूर्णा(प्रतिनिधी)
शासनाने राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण केले असून, पूर्णेच्या आय टी आयला(ITI)आता तालुक्याचे कृषीभुषण स्व. अँड गंगाधर (दादा) पवार यांचं नाव देण्यात आले असून शनिवारी ७ रोजी पांगरा रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नामविस्तार सोहळा संपन्न झाला.
नामविस्तार सोहळ्यास स्व.दादा पवार यांच्या पत्नी सुमनबाई,मुलगा व त्यांचे भाऊ यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संजय पवार, प्रमुख पाहुणे डॉ.केदार कटींग,मा.नगराध्यक्ष उत्तमरावजी कदम, साहेबरावजी कदम, प्राचार्य रामेश्वर पवार, अमृतराज कदम, बाळासाहेब कदम,ITI चे प्राचार्य अन्नपूर्णे
पप्पू किरडे आदींसह पुर्णा तालुक्यातील रा.स्व.सेवक संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले.तालुक्यातील भुमि पत्राचे नांव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्यात आल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
*स्व.अँड.गंगाधर (दादा) पवार परिचय*
पूर्णा तालुक्यातील गोदाकाठच्या वझुर गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले दादा हे जुन्या पिढीतील उच्च विद्या विभुषीत विधीज्ञ होते.दादांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करत असताना परभणी जिल्हा सरसंघचालक ते देवगीरी प्रांताचे प्रांत अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.समाजीक तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत त्यांनी आपल्या मुलांना देखील उच्च शिक्षण शिकवले.शेवटच्या स्वासा पर्यंत त्यांनी समाजीक बांधीलकी जोपासली.