शिक्षक,शिक्षण समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्णेतील शाळा पाडल्या बंद

Spread the love

पूर्णा ता.८(प्रतिनिधी)

राज्यातील अंशतः विनाअनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळत नसल्याने संतापलेल्या विविध संघटनांनी ८ व ९ जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंदची हाक दिली होती.त्यानुसार पूर्णा तालुक्यातील शिक्षक, शिक्षण समन्वय संघाचे पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शाळा बंद करण्याचे आवाहन दिले.यास शहरासह तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

राज्यभरातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाचा प्रश्न कायम आहे. १४ ऑक्टोबर २०२४ ला शासनाने अद्यादेश काढला. परंतु, अद्याप त्याची अंमलबजावणी केली नाही. अंशत: शाळा टप्पावाढीसाठी आर्थिक तरतूद होत नसल्याने राज्यभरातील शिक्षक, शिक्षण समन्वय संघाचे पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या गळचेपी धोरणाविरोधात आझाद मैदानात ५ जूनपासून उपोषणास बसले आहेत.या आंदोलनास पाठिंबा म्हणून पूर्णा तालुक्यातील शिक्षक, शिक्षण समन्वय संघाच्या कोलगाने सर, तुषार पाटील सर, परबत मॅडम, वानखेडे सर, लोखंडे सर, धुळे सर, सारंग सर, आदींनी रस्त्यावर उतरून शहर व तालुक्यातील विनाअनुदानित शाळांसह अनुदानित शाळाही बंद पाडल्या .यावेळी शासनाच्या धोरणाविरोधात शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘टप्पा अनुदान दया अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन करू,’ असा गर्भित ईशाराही यावेळी शिक्षक संघटनांनी दिला आहे. शिक्षकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाच्या वतीने शासनास पाठवले आहे.

You cannot copy content of this page