छ.शिवाजी महाराज महाराजस्व शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
पूर्णा ता.८(प्रतिनिधी)/
महसूल व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गौर येथील सोमेश्वर मंगल कार्यालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानचे आयोजन दि.८ जुलै रोजी करण्यात आले. या शिबिराचा शुभारंभ तहसीलदार माधवराव बोथिकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, नायब तहसीलदार कृष्णाजी मस्के आणि पुरवठा निरीक्षक सतीश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सदर शिबिरात एकूण नऊ शासकीय विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत वारस फेरफार नोंदी करून सातबारा वितरण, आरोग्य विभागामार्फत बेबी किट व उपोषण आहाराचे वाटप, संजय गांधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, पुरवठा विभागामार्फत नवीन रेशन कार्ड वाटप, तसेच आधार दुरुस्ती केंद्रामार्फत नागरिकांच्या आधारमध्ये आवश्यक बदल करण्यात आले.संकीर्ण विभागामार्फत उत्पन्न, जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रीतम वसमतकर, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, महिला व बालविकास विभागाच्या श्रीमती काळे, पशुवैद्यकीय अधिकारी कोकरे, आरोग्य विभागाच्या अश्विनी भोसले, मंडळ अधिकारी शिंदे, तलाठी गोरे, तलाठी चितमपल्ली, सरपंच चंद्रकांत सावळे, ग्रामविकास अधिकारी ए. आर. लाडेकर, विद्युत सहाय्यक भंडारी, कोतवाल शिवप्रसाद देवने, दादाराव घायाळ, सातपुते, साईनाथ दाढे, अंगणवाडी मदतनीस, आशा स्वयंसेविका व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











