Purna|पूर्णेत सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राची सुरुवात
पूर्णा/प्रतिनिधी
तालुका खरेदी-विक्री संघ व नाफेडच्या वतीने यावर्षी शेतक-यांना सोयाबीन खरेदीसाठी (Central Gov)केंद्र शासनाने ठरवून दिलेला हमीभाव मिळावा यासाठी तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने सोमवारी (Soyabin)सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राचा प्रारंभ करण्यात आला.सोमवारी पूर्णा ते पांगरा रस्त्यावरील (Samarth market)समर्थ कृषि उत्पन्न बाजार समितीचे आवारामध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्णा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बापुराव घाटोळ हे होते. ज्येष्ठ संचालक मारोतराव भुसारे व समर्थ बाजार समितीचे डॉ. लोलगे हे उपस्थित होते. सर्वप्रथम सोयाबीन विक्री आणलेल्या गौर येथील शेतकरी मोहन पारवे यांचा खरेदी विक्री संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास खरेदी-विक्री संघाचे संचालक चांदोजी बोबडे, रमेश काळबांडे, सूर्यभान दुधाटे, भगवान इंगोले, तुळशीराम बोबडे, रामभाऊ ढवळे, बालाजी भोसले, मोहन बनसोडे, बबन आडबाल यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी खरेदी विक्री संघाचे कर्मचारी बालाजी शिंदे, संदीप घाटोळ यांनी पढाकार घेतला. शेतक-यांनी हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, यावेळी बापुराव घाटोळ यांनी सांगितले की, पूर्णा तालुका खरेदी विक्री संघ हा पूर्णपणे मागील काही वर्षांपासून टिकून आहे. या संघाच्या माध्यमातून दरवर्षी शेतक-यांच्या शेतातील उत्पादित झालेला मालाला अधिकचा भाव मिळावा यासाठी नापेâडच्या वतीने खरेदी केला जातो. त्यामुळे यावर्षीही केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे शेतक-यांना ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल असा सोयाबीनला भाव मिळणार आहे. तेव्हा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयामध्ये ऑनलाईन नावनोंदणी करावी व हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन घाटोळ यांनी केले.