३५अनाथ बालक,एकल पालक मुलांना दिवाळी भेट

Spread the love

पूर्णा तालुका;गावात एचएआरसी संस्थेचा कौतुकास्पद उपक्रम
पूर्णा/प्रतिनिधी
विविध सणंवारात निराधार ताई, एच.आय.व्ही बाधीत,अनाथ बालके,एकर पालक मुलांसाठी निरनिराळे उपक्रम राबवीणा-या होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी ) संस्थेच्यावतीने टीमने दिवाळसणा निमीत्य पूर्णा तालुक्यातील तब्बल ३५ अनाथ बालक,एकल पालक मुलांना दिवाळी भेट देऊ केली आहे.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मागील १४ वर्षा पासून एचएआरसी संस्था एचआयव्ही बाधित,अनाथ व वंचित व एकल पालक, निराधार ताई यांच्या मदतीला धावून जाते. उपेक्षितांना सणावाराला आप्तेष्टांची उणीव भासु नये त्यांचे सण गोड व्हावेत यासाठी साहीत्याची मदतही करते.यावर्षी दिवाळ सणाच्या पार्श्वभूमीवर एचएआरसी संस्थेच्या वतीने पूर्णा तालुक्यातील फुलकळस, ताडकळस, कमलापूर, खडाळा, महागाव, दस्तापुर, लिंमला, मजलापूर यागावातील तब्बल ३५ अनाथ,एकल पालक यांचा शोध घेत त्यांची दिवाळी आनंदात जावी यासाठी २४ ऑक्टोबर रोजी जि.प. के.प्रा. शाळा फुलकळस येथे एक कार्यक्रम घेऊन उपेक्षित मुला मुलींना दिवाळी किटचे वाटप केले.यावेळी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक, मुख्याध्यापक दयानंद स्वामी,राजेंद्र खापरे,शिवानी मोहोरकर,मारुती डोईफोडे,संतोष रत्नपारखे,प्रशांत टाक,महेश लोहोकरे,मीना सावळे, रूकमाकांत लेंडाळे,तानाजी कळसाइतकर,स्मिता डिग्रसकर आदीं तालुक्यातील शिक्षक ग्रामस्थांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत टाक तर आभार प्रदर्शन पांडुरंग डुकरे यांनी केले.कार्यक्रमात डॉ.पवन चांडक यांनी आपले मनोगत व्यक्त करत समाजातील उपेक्षित मुलामुलींना मदत करण्यासाठी एच.ए.आर.सी काम करत आहे.गरजू व अनाथ मुलांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी दात्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

You cannot copy content of this page