अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीत पोलीसांसह पुर्णेकरही धावले
पुर्णा पोलीसांकडून जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य सायकल रॅलीचे आयोजन;शहरातील मान्यवरांसह शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी हजेरी
पूर्णा ता.२१(प्रतिनिधी)Anti-Drug Awareness Rallyयेथिल पोलीस दलाकडून आयोजित अमली पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅलीत जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व पोलीस कर्मचाऱ्यांसह शहरातील अनेक जणं सायकल घेऊन धावले.गुरुवारी (ता.२१) रोजी सकाळी आयोजित या रॅली प्रसंगी शहरातील मान्यवरांसह शाळकरी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पुर्णा पोलीस ठाण्याच्या वतीने अमली पदार्थ निर्मूलनासाठी सुरू असलेल्या जनजागृती अभियानाचा भाग म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी गुरुवारी सकाळी ७ वाजता शहरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन केले होते.

प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी,भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो, मौलाना शमिम रिझवी,रिपाइं नेते प्रकाशदादा कांबळे,जिल्हाप्रमुख विशाल कदम,डॉ विनय वाघमारे, यांच्यासह ना.त.प्रशांत थारकर, अप्पर पो.अ.सुरज गुंजाळ, यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शहरातील आजी- माजी लोकप्रतिनिधीं डाॅक्टर, समाजीक कार्यकर्ते, पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकां पासून सुरू करण्यात आलेली ही रॅली शहरातील स्टेट बँक, आनंदनगर चौक, राजमुद्रा चौक, टि-पाईन्ट म.बसवेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथील मार्गावर काढण्यात आली.जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, ना.त.थारकर, जिल्हा प्रमुख विशाल कदम,अप्पर, पो.अ.गुंजाळ,उप विभागीय पो.अ. डाॅ.पाटील पो.नि. गोबाडे, यांच्या शहरातील अनेक शाळांतील विद्यार्थी शिक्षकांस, स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते.यावेळी रॅलीचा शुभारंभ जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी झेंडा दाखवून केला.यावेळी बोलताना ते म्हणाले की,युवकांचे आरोग्य, त्यांचा उत्साह आणि त्यांच्या आयुष्याचा उज्ज्वल प्रवास हाच आपल्या समाजाचा खरा आधार आहे. नशामुक्त समाजासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न काम केले तर त्याचा फायदा होईल, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक परदेशी यांनी केले व उपस्थित सर्वांना अमली पदार्थ विरोधीची शपथ दिली.रॅली यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी बंडु राठोड, सोनेराव जाधव,पवन लांडेवाड आदींनी परिश्रम घेतले.











