रेल्वे खाली सापडून २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू..

Spread the love

पूर्णा रेल्वे स्थानक परिसरातील घटना; लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

पूर्णा ता.२३(प्रतिनिधी)

रेल्वे खाली सापडून घडलेल्या अपघाताच्या घटनेत येथील एका २८ वर्षीय तरुणाचा जागीच दुदैवी मृत्यू झाल्याची घटना पूर्णा रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी (ता.२३) रोजी घडल्याचे उघडकीस आले आहे.या प्रकरणी स्टेशन मास्तरांनी दिलेल्या खबरीवरुन लोहमार्ग पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

     धिरज सुरेश काळे (वय२८) रा.विजयनगर पूर्णा ता.पूर्णा जि.परभणी असं त्या मयत तरुणाचे नाव आहे.घटने बाबतीत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार दु.२:३० वाजण्याच्या सुमारास मयत व्यक्ती हा रेल्वे स्थानकावरील ४ नंबर प्लॅटफॉर्मवर नांदेडच्या दिशेने उभा होता.तो रेल्वे ट्रॅक ओलांडून पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर जात असताना ३१९/१२/१३ मैल अंतरावर धावत्या रेल्वेखाली सापडला.यात त्याच्या देहाचे दोन तुकडे तुकडे होऊन त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.घटनास्थळी अक्षरशःरक्ताचा सडा पडला होता.घटनेची माहिती रेल्वे स्टेशन मास्तर पंकज कुमार यांनी लोहमार्ग पोलीसांना दिली.लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पो.हवा.सिद्धेश्वर देशमाने ,रेसुबलाचे गावंडे , होमगार्ड प्रकाश वाघमारे आदीं घटनास्थळी धाव घेऊन छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला .घटनास्थळी पंचनामा करून मयताची ओळख पटवली.मयत तरुण धिरज काळे हा शहरातील विजय नगर भागातील असुन तो विट भट्टी कामगार असल्याचे समजते.पोलीसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आला असून,या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तपास पो.हवा.सिद्धेश्वर देशमाने करत आहेत.

You cannot copy content of this page