राज्यस्थानी मल्टिस्टेट बँकेवर फसवणूकीचा गुन्हा दाखल
फसवणूक झालेल्या नागरीकांनी संपर्क करण्याचे परभणी पोलिसांचे आवाहन
परभणी ता.२०/प्रतिनिधी
जास्त व्याज देण्याचे खोटे आमिष दाखवून लोकांना गुंतवणूक करण्यास सांगून सुमारे 76 लाख रूपयांच्या ठेवी घेऊन फसवणुक केल्या प्रकरणी राज्यस्थानी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी परळी वैजनाथ शाखा परभणी या बँकेवर फसवणूक केल्या प्रकरणी नानलपेठ पोलिसात विविध कायद्यान्वये फसवणूकीचा गुन्हा गुरूवारी (दि.19) दाखल करण्यात आला आहे.
राज्यस्थानी मल्टिस्टेटच्या परभणी शाखेत जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून 76 लाख रूपयांच्या ठेवी घेऊन पळून गेल्याची तक्रार बुधवारी (दि.11) बँकेच्या 21 खातेदारांनी नानलपेठ पोलिसात तक्रार करत गुन्हा दाखल केला होता. पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती पाहून या प्रकरणी तपास करण्याचे आर्थिक गुन्हे शाखेस आदेश देऊन गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. परभणी जिल्हयातील राज्यस्थानी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड परळी वैजनाथ यांच्याकडून आर्थिक फसवणूक झाली असल्यास कागदपत्रांसह तात्काळ आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधिक्षक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन परभणी पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
__________