सौ.रेखाबाई माकुलवार यांचं निधन
पूर्णा ७ जुलै (प्रतिनिधी)
येथिल स्वस्तिक नगरातील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल माकुलवार यांच्या मातोश्री सौ रेखाताई माकुलवार यांचं ६ जुलै रविवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.मृत्युसमयी त्यांच वय ५३ वर्ष होते.त्यांच्या पार्थिवावर पुर्णा येथील स्मशानभूमीत आज सोमवारी सकाळी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पती रमेशराव माकुलवार, मुलगा राहुल, दोन मुली,सुष्ना, जावई, नातवंडे,असा मोठा परिवार आहे












