जागतिक पर्यावरण दिन;रिलायबल अॅग्रो फूड्सच्या वतीने जनजागृती,वृक्षारोपण

Spread the love

पूर्णा ता.५ (प्रतिनिधी)

येथिल रिलायबल अॅग्रो फूड्स लि.कानडखेड यांच्या वतीने गुरुवारी ता.५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करत जनजागृती करण्यात आली.

पूर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारातील रिलायबल ऍग्रो फूड्स कंपनीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.यावर्षीही कंपनीत वृक्षारोपणसह जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले होते.यावेळी प्रमुख उपस्थितीत सरपंच मारोतराव बखाल,एचएमए ग्रुपचे संचालक श्री.शाहिद हुसेन, व्यवस्थापक अमरनाथ पटेल,अब्दुल समद, शेख इस्माईल यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण मार्च, सायक्लोथॉन आणि काही जनजागृती सत्रांसह वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी सरपंच मारोतराव बखाल यांनी पर्यावरण संरक्षणावर बोलताना नागरिकांनी प्लास्टिकचा कमी वापर किंवा न वापरण्यास प्रोत्साहित केले तरच.येणाऱ्या भविष्यासाठी,भावी पिढीसाठी उत्तम नैसर्गिक वातावरण उपलब्ध होईल त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असं आवाहन केलं.त्यासोबतच एचएमए ग्रुपचे संचालक श्री.शाहिद हुसेन, व्यवस्थापक अमरनाथ पटेल, पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केले.

You cannot copy content of this page