परळी(वै) रेल्वे स्टेशनची सुरक्षा होणार “स्मार्ट आणि शिस्तबद्ध”.!-रेसुबलाच्या महानिरीक्षक आरोमासिंग ठाकूर

Spread the love

ठाकूर यांचा पाहणी दौरा;सुरक्षा कडक करण्याचे आश्वासन

परळी ता.१७(प्रतिनिधी)RPF IG Aromasingh Thakur visitतिर्थक्षेत्र परळी वैजनाथ रेल्वे जंक्शन हे देशातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकापैकी एक आहे.यास्थानकावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे.स्थानकावर २१ सुरक्षा रक्षक तैनात आहेत.जवानांची संख्या वाढवण्याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल.परळी स्थानकावर घडलेल्या ६ वर्षीय बालीकेच्या अत्याचार प्रकरणा सारखं दुसरं प्रकरण घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल.परळीकरांसह इथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक पर्यटकांच्या दृष्टीने रेल्वे स्टेशनची सुरक्षा होणार “स्मार्ट आणि शिस्तबद्ध” होणार असल्याचे आश्वासन दक्षिण मध्य रेल्वेच्या महानिरीक्षक आरोमासिंग ठाकूर यांनी दिले.

परळी रेल्वे स्थानकावर नुकत्याच घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या महानिरीक्षक अरोमा सिंग ठाकूर यांनी बुधवारी (ता.१७) रोजी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.यावेळी त्यांनी स्थानिक माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत सुरक्षा बाबतीत सुचनाही ऐकुन घेतल्या.येथिल आरपीएफ कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी व जवानांशी संवाद साधत येथिल पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. नुकत्याच घडलेल्या अत्याचार प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. परळी रेल्वे स्थानक व परीसरात नवीन इमारतीसह ३६ अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. हे कॅमेरे गुन्हेगारांच्या चेहऱ्याची त्वरित ओळख करून सायरनद्वारे आरपीएफ कार्यालयाला इशारा देतील. त्यामुळे गुन्हेगारांना गुन्हा करण्यापूर्वीच पकडण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास आयजींनी व्यक्त केला.

यावेळी स्थानिक रेल्वे सुरक्षा बलाच्या अधीका-यांसह पत्रकार धीरज जंगले, जगदीश शिंदे, बालाजी ढगे, बाबा शेख, प्रकाश वर्मा, दशरथ रोडे, मुक्रम शेख, शेख मुदस्सिर, सय्यद सबाहत अली आदी पत्रकार संपादक बांधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page