विद्यापीठस्तरीय इलेक्ट्राॅनिक्स विषयाची कार्यशाळा
पूर्णेतील श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाचा उपक्रम
पूर्णा(प्रतिनिधी)
येथिल श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी २६ एप्रिल रोजी विद्यापीठस्तरीय इलेक्ट्राॅनिक्स विषयाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व पूर्णेतील श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालय यांच्या संयुक्तविद्यमाने ता.२६ एप्रिल रोजी महाविद्यालयात एनईपी-२०२० नुसार बी.एस्सी इलेक्ट्राॅनिक्स विषयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यापीठस्तरीय एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री डॉ.गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महास्वामीजी कार्यशाळेचे उदघाटक म्हणून स्वा.रा.तीर्थ. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक महाजन संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोदअण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम सह सचिव गोविंदराव कदम तसेच प्रमुख पाहूणे प्रो.एम.के.पाटील डीन,सायन्स अँड टेक्नॉलॉजी(स्वा.रा.ती.म.विद्यापीठ), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.राजकुमार उपप्राचार्य डॉ.गजानन कुरुंदकर व डॉ. शिवसांब कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.इलेक्ट्रानिक्स विषयाच्या टेक्निकल शेषणचे अध्यक्ष म्हणून इलेक्ट्रानिक्स अभ्यास मंडळाचे प्रतिनिधी डॉ. वाय.एस. जोशी (स्वा.रा.तीर्थ.विद्यापीठ) यांची प्रमुख उपस्थिती होती.टेक्निकल शेषणचे प्रास्ताविक डॉ.शेषेराव शेटे यांनी केले. डॉ. वाय.एस. जोशी यांनी नवीन अभ्यासक्रमा वर विदयार्थ्यांना भविष्यात उपयोगी पडणारा अभ्यासक्रम तयार व्हावा आणि या कार्यशाळेत त्यावर सविस्तर चर्चा होऊन सर्वांच्या सहमतीने विदयार्थ्यांना अतिशय सोपा व सुटसुटीत अभ्यासक्रम तयार करण्यासाठी या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाचा आभार डॉ. सोमनाथ गुंजकर यांनी केले.