“शेतकऱ्यांसोबत आहोत,ओला-दुष्काळ जाहीर करावा”सरकारला मागणी करणार -शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम

Spread the love

पुर्णा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या धानोरा काळे,मुंबर,गोळेगांव,देऊळगांव भागाची पाहणी

पुर्णा ता.२५ (प्रतिनिधी)
मागील महीन्यापासुं सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात भिषण परिस्थिती उद्भवली आहे.हजारो हेक्टर शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख विशालभाऊ कदम यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील धनोरा काळे, मुंबर, गोरेगाव व देऊळगाव या गावांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.पूरग्रस्त व पिकांचे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना कदम यांनी त्यांना धीर दिला. ते म्हणाले की, “शेतकऱ्यांचे हाल पाहून मन हेलावले आहे. आपण शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभे आहोत. शासन दरबारी आपली मागणी नक्कीच पोहोचवू. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरसकट ओला-दुष्काळ जाहीर करावा,” अशी विनंती शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत सरकारला करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी ग्रामस्थांसह कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जिल्हाप्रमुखांसमोर मांडले. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली.


You cannot copy content of this page