Purna Dahindiपालकमंत्री बोर्डीकरांच्या हस्ते शिवसेनेच्या दहीहंडीचे थाटात उद्घाटन

Spread the love

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उस्ताह;हजारों भाविकांची हजेरी

पूर्णा ता.१७(प्रतिनिधी)

Purna Dahihandi Festival परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते जिल्हा प्रमुख विशाल कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश सुमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता.१७) रोजी पुर्णेत शिवसेनेची दहीहंडी फोडुन औपचारिक उद्घाटन करण्यात आले.यावेळी गोविंदा पथकांची चित्त थरारक प्रात्यक्षिके पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

oplus_133120

पूर्णा शहरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने लाखों रुपयांची बक्षिसे असलेल्या दहीहंडी फोड महोत्सवाचे आयोजन रविवारी सायं करण्यात आले होते.(State minister Meghana Bordikar)पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी औपचारिकपणे दहीहंडी फोडून महोत्सवाचे उद्घाटन केले.प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यासह मंचावर मा.नगराध्यक्ष उत्तमरावजी कदम, सत्यनारायण कुल्थे,ता.अ.प्रकाशराव क-हाळे, शहराध्यक्ष अँड विशाल किरडे,युवा नेते गणेश कदम,प्रशांत कापसे, नवनाथ लोखंडे,नारायणराव पिसाळ, सचिन (पप्पु) कदम, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

oplus_133120

पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते सिंदुर आॅपरेशशन मध्ये सहभागी असलेले धारासुर येथील जवान मुंजाजी कदम यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की,दहीहंडी महोत्सवातुन धार्मिकतेसह ,सांस्कृतिक वारसाही जपला जातो, याखेळातुन खेळाडू वृत्तीही वृध्दींगत होते त्यामुळे शासनानेही दहीहंडी महोत्सवाला विशेष दर्जा दिला आहे.पुर्णा शहरात विशाल कदम यांनी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव आयोजित करत सांस्कृतिक वारसा जोपाण्याचे काम केले आहे.शहर व तालुक्याच्या विकासासाठी पुर्णेकरांनी कोणत्याही विकास कामाची मागणी केल्यास ते काम करण्यास सदैव वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

oplus_131104

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विशाल कदम म्हणाले की,पुर्णेची भुमी ही सांस्कृतिक भुमी आहे.मागील काही काळात सांस्कृतिक कार्यक्रमांना खंड पडला होता.परंतु यापुढे असे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या हर्षोल्लासात साजरे करण्यात येणार असल्याचे यांनी प्रास्ताविकपर बोलताना सांगितले.दहीहंडी महोत्सवात नांदेड,परभणी, जिल्हा सात ते आठ संघांनी नोंदणी केली.यावेळी गोविंदांनी प्रारंभी ४ तर लाऊन आयोजकांना सलामी दिली.३० फुट उंचीवर सजवुन बांधलेली दहीहंडी तसेच संगीताची मधुर लय, सामुहिक न्यृत्य,आदींची रचना केली होती.रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता….

You cannot copy content of this page