आई-वडिलांसह कर्मभूमीशी प्रामाणिक रहा-शास्त्रज्ञ डॉ.राजाराम माने
पूर्णेतील श्रीगुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयामध्ये पदवीप्रदान समारंभ संपन्न
पूर्णा ता.१८(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना अतिउच्च पदावर जायचा असेल तर कष्टाशिवाय कोणताही शॉटकट नाही. आपल्या कामाप्रती प्रामाणिक रहा कष्ट करा जग खूप सुंदर आहे. इतरांना तुम्ही आदर दिला तर त्याची परतफेड तुम्हाला चांगलीच मिळेल. तुम्ही किती जरी मोठे झालात आपल्या आई-वडिलांना व कर्मभूमीला प्रामाणिक राहा असे प्रतिपादन स्वा.रा.ति.मराठवाडा विद्यापिठातील शास्त्रज्ञ डॉ राजाराम माने केले.
स्वा.रा.तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या निर्देशाप्रमाणे पूर्णा येथिल श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयामध्ये ता.१८ रोजी ५ व्या पदवीप्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.प्रसंगी डॉ. माने बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री गुरु डॉ.नंदिकेश्वर शिवाचार्य स्वामीजी तर प्रमुख अतिथी कार्याध्यक्ष प्रमोदअण्णा एकलारे,सचिव अमृतराज कदम, कोषाध्यक्ष उत्तमरावजी कदम,सहसचिव प्रा.गोविंदराव कदम,प्राचार्य डॉ.के राजकुमार,यांच्या सह डॉ.गजानन कुरुंदकर, डॉ.शिवसांब कापसे, डॉ.विजय पवार,डॉ राजू शेख यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते २०२४-२५ मध्ये उत्तीर्ण झाले ६९ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
पुढे बोलताना डॉ माने म्हणाले की,जिद्द व मेहनतीच्या जोरावर ३७ देशामध्ये मी संशोधन कार्य करू शकलो. कामाप्रती असणारी श्रद्धा व आत्मीयता हे तुम्हाला तुमचे यश संपादन करण्यासाठी मदत करते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.के.राजकुमार,सूत्रसंचालन डॉ.पल्लवी चव्हाण तर आभार डॉ.राजू शेख यांनी केले.सदरील कार्यक्रमाला महाविद्यालया तील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विदयार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.













