पुर्णेतील श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात प्रबोधनकार ठाकरे जयंती साजरी
पूर्णा (प्रतिनिधी): श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी कार्याध्यक्ष प्रमोदअण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम, सहसचिव प्रा. गोविंदराव कदम यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमात प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे जीवनकार्य उलगडले. ते मराठी पत्रकार, समाजसुधारक, प्रभावी वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नायक असल्याचे सांगून त्यांच्या कार्याचे स्मरण केले.कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. डॉ. गजानन कुरुंदकर, प्रा. डॉ. शिवसांब कापसे, उमाशंकर मिटकरी, प्रा. डॉ. जितेंद्र पुल्ले, प्रा. डॉ. पुष्पा गंगासागर, प्रा. डॉ. अजय कुऱ्हे, प्रा. डॉ. राजीव यशवंते, प्रा. डॉ. संतोष चांडोळे, प्रा. राजेश पर्लेकर यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजू शेख आणि प्रा. डॉ. दैवशाला कमठाणे यांनी केले.