श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात ‘महिला सुरक्षितता’ विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम
पूर्णा (प्रतिनिधी) :
श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘महिला सुरक्षितता’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.
कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून समितीच्या समन्वयक प्रा. डॉ. अलका कौसडीकर यांनी विद्यार्थिनींना समितीचे कार्य, उद्दिष्टे व सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. पुष्पा गंगासागर यांनी अडचणींवर मात करून यशस्वी होण्याचे सूत्र सांगितले. तसेच माजी विद्यार्थिनी म्हणून प्रा. डॉ. वृषाली आंबटकर व प्रा. डॉ. स्मिता जमदाडे यांनी अनुभवाधारित मार्गदर्शन दिले.
प्रा. डॉ. दिशा मोरे यांनी स्वतः सतर्क राहण्याचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थिनींना पालकांचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात प्रा. पुष्पलता क्षिरसागर यांनी मुलींनी कोणत्याही अडचणींबाबत तक्रार पेटीत नोंद करण्याचे आवाहन केले व त्या तक्रारींचे निवारण करण्याची ग्वाही दिली. याशिवाय सार्वजनिक तसेच वैयक्तिक आरोग्य राखण्यासाठीही त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार, उपप्राचार्य प्रा. डॉ. शिवसांब कापसे, प्रा. डॉ. गजानन कुरुंदकर, प्रा. डॉ. संजय दळवी तसेच पर्यवेक्षक प्रा. उमाशंकर मिटकरी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या महिला संचालिका सौ. भाग्यश्रीताई प्रमोदअण्णा एकलारे व सौ. स्मिताताई अमृतराज कदम यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सत्वशिला पवार यांनी केले. प्रा. साधना गंडरघोळ, श्रीमती शोभाबाई कदम यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. गणेश सोळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले.