श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

Spread the love

पुर्णा,ता.२(प्रतिनिधी)

येथिल श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना मराठी भाषेची आवड आणि त्या माध्यमातून त्यांच्या सृजनात्मक लेखनाला चालना देणे या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या निर्मितीला प्रसिद्धी मिळावी,त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थीनी वेदिका बोकारे लिखित कवितांचे भिंतीपत्रक महाविद्यालयात प्रसिद्ध करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के राजकुमार यांनी विद्यार्थ्यांच्या लेखनाचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. संजय दळवी यांची उपस्थिती होती. तसेच विद्यार्थ्यांना ग्रंथाची आवड निर्माण व्हावी यासाठी मराठी विभागाने ग्रंथ प्रदर्शन भरवले होते यास देखील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ. शिवसांब कापसे, डॉ राजीव यशवंते, डॉ विजय पवार, डॉ सोमनाथ गुंजकर , डॉ अंबिका चोंडे यांची उपस्थिती होती

You cannot copy content of this page