श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात पदवीप्रदान सोहळ्याचे आयोजन
पूर्णा ता.१६(प्रतिनिधी):
जिल्ह्यातील क्षैक्षणीक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या पूर्णा येथील श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात, शुक्रवार (ता.१८) जुलै रोजी पदवीप्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन,या सोहळ्यास माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के.राजकुमार यांनी केले आहे.
पूर्णा येथील श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयाच्या वतीने २०२३-२०२४ शैक्षणिक वर्षातील पास झालेल्या पदवीधारक विद्यार्थ्यांच्या पदवीप्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन,हा सोहळा स्वा.रा.तिर्थ मराठवाडा विद्यापीठातील शास्त्रज्ञ प्रा.डॉ. राजाराम माने,यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयात शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास संपन्न होणार आहे. यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री.नंदिकेश्वर शिवाचार्य स्वामीजी,कार्याध्यक्ष प्रमोद ऊर्फ राजुअण्णा एकलारे,सचिव अमृतराज कदम, कोषाध्यक्ष उत्तमराव कदम,सहसचिव प्रा. गोविंदराव कदम आदीं मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.पदवीदान पूर्व विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करवून घेण्यासाठी परीक्षाधिकारी म्हणून प्रा.डॉ.राजु शेख यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.