Shri Nagnath Temple:भर पावसात सुमारे १ लाख भाविकांनी घेतले औंढा नागनाथाचे दर्शन.!
श्री नागनाथ मंदिरात श्रावणातील चौथ्या श्रावण सोमवारी महापूजेनंतर, हजारो शिवभक्तांनी घेतले श्री नागनाथाचे दर्शन.!
हिंगोली/औ़ढा नागनाथ ता.१९(प्रतिनिधी) Shri Nagnath Temple हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथिल आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात (Shri Nagnath Temple) श्रावणातील चौथ्या सोमवारी सुमारे १ लाख भाविकांनी भर पावसात श्री नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली असल्याची माहिती आहे.

देशभरातील लाखों शिवभक्त श्रावणात ८ वे ज्योर्तिलींग औंढा नागनाथ येथे दर्शन घेतात.भाविकांनी यावर्षी मागील वर्षीच्या गर्दीचा उच्चांक मोडीत काढला आहे.श्रावणाच्या ४ थ्या सोमवारी (ता.१८) रोजी देखील १ लाखांहून अधिक भाविकांनी भर पावसात श्रींच्या दर्शनासाठी बम बम भोले च्या गजरात रांगा लावल्या होत्या.यावेळी हजारो भाविक मंदिरात दाखल झाले.!तत्पूर्वी रविवारी मध्यरात्री १ वाजता श्री नागनाथाची मंदिराचे अधीक्षक वैजनाथ पवार, शरद पाटील माजी नगराध्यक्षा दिपालीताई पाटील, गार्ड प्रमुख बबन सोनूणे, वैशाली सोनूणे यांच्या हस्ते विधिवत महापूजा करण्यात आली. यानंतर, २ वाजता शिवभक्त साठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यादरम्यान, मंदिराचे अध्यक्ष तहसीलदार हरीश गाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक यांनी शिवभक्तांना रांगेत फराळ व पाण्याची व्यवस्था केली. पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, साहाय्य क पोलीस उपनिरीक्षक पंजाब थिटे, माधव सूर्यवंशी, रमेश मस्के अमोल चव्हाण, यांनी बंदोबस्त ठेवला दरम्यान, दुपारी ३ वाजेपर्यंत ८० ते ९० हजाराच्या वर भाविकांनी श्री नागनाथाचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिराचे व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांनी दिली.











