आमल्या बारसीला रंगला सिद्धेश्वर महादेवाचा पालखी सोहळा

Spread the love

पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

पूर्णा(प्रतिनिधी)

पुरातण मंदिराचे गांव म्हणून ओळख असलेल्या पूर्णा तालुक्यातील मौजे एरंडेश्वर येथे ता.११ एप्रिल रोजी शुक्रवारी रात्री आमल्या बारशी निमित्ताने श्री सिद्धेश्वर महादेवाचा भव्य पालखी सोहळा तालुक्यातील एरंडेश्वर येथील श्री सिद्धे्वर महादेवाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही एरंडेश्वर येथे आमल्या बारसीचे औचित्य साधून पुरातण सिद्धेश्वर महादेवाच्या भव्य पालखी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावाने आयोजन करण्यात आले होते.’हर हर महादेव ‘ जयघोषाच्या निनादात ही पालखी मिरवणूक एरंडेश्वर येथील मुख्य मार्गावरून काढण्यात आली.तत्पुर्वी मंदिरात श्रींची पूजा, अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर भक्तांनी हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम सादर करत भक्तीचे सूर आळवले.या मिरवणुकीस पंचक्रोशीतील भाविक श मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पारंपरिक वेशभूषा, लेझीम पथक, ढोल-ताशा व विविध सांस्कृतिक वाद्यांनी परिसर निनादुन गेलेला दिसून आला. संपूर्ण गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.पालखी सोहळा निमित्ताने गावात सकाळपासूनच भक्तांची रेलचेल सुरू झाली होती. गावातील नागरिक व विविध मंडळांनी मार्गावर आकर्षक फुलांच्या रांगोळ्या काढून स्वागत केले. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात एकात्मता व भक्तिभावाची भावना अधिक दृढ झाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

You cannot copy content of this page