राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या वाहनावर शाई फेकली

Spread the love

गंगाखेड येथील घटना;गुन्हा दाखल;दोघे पोलीसांच्या ताब्यात

परभणी ता.१ (प्रतिनिधी)राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करीत असून शेतकरी प्रश्नांवर गंभीर नसल्याचा आरोप करीत गंगाखेड येथे राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांच्या शासकीय वाहनावर दोन युवकांनी शाईपेक केल्याची घटना गुरूवारी(दि. ३०) सायंकाळी घडली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर या गंगाखेड शहरात आयोजित जनता दरबार कार्यक्रम स्थळी शासकीय वाहनाने प्रवेश करीत असतानाच त्यांच्या शासकीय वाहन क्रं – एचआर ९८ डब्ल्यू ३४५६ या वाहनावर योगेश भगवानराव फड(वय ३८) रा. खादगांव, हल्ली मुक्काम संत जनाबाई नगर, गंगाखेड आणि दीपक शिवराम फड (वय ३५)रा. खादगाव असे शाईफेक केलेल्या दोघा युवकांची नावे आहेत. पालकमंत्री बोर्डीकर जनता दरबार कार्यक्रमस्थळी प्रवेश करीत असताना एकाने त्याच्या हातातील बाटलीमधील काळ्या रंगाची शाई पालकमंत्र्याच्या गाडीवर भिरकावली. तर दुसऱ्याने हातामध्ये रेड ऑक्साईड स्ट्राइक हायग्लोजचा डब्बा गाडीवर फेकला. दोघांनाही गंगाखेड पोलिसांनी क्षणार्धात ताब्यात घेतले. याप्रकरणी गंगाखेड पोलिसांत दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायद्याच्या अनुच्छेद ११८(१), १२५, १२१, ६२ आणी ३(५)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही युवक पोलिसांच्या ताब्यात आहेत.

You cannot copy content of this page