जगाला युद्ध नको बुद्ध हवेत-भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो

Spread the love

पूर्णेत तथागत गौतम बुद्धाच्या जयंतीनिमित्त सामुहिक बुद्ध वंदना तसेच भव्य शोभायात्रा

पूर्णा(प्रतिनिधी)

जगाला बुद्धाच्या विचाराने प्रेरित केल्याने जगामध्ये शांती नांदत आहे. अशा बुद्धांचा जन्म या देशात झाला, आज बुद्धांच्या विचारांची गरज आज जगाला आहे. “युद्ध नको बुद्ध हवा” आहे असं संपूर्ण जग म्हणत असल्याचे प्रतिपादन भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो

पूर्णा शहरातील बुद्ध विहारात ता.१२ में रोजी भव्य स्वरुपात बुद्ध पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या निमिताने बुद्ध विहाराच्या प्रांगणात सकाळी ७ वा सामुहिक महाबुद्ध वंदनेचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी भदंत डॉ उपगुप्त महाथेरो बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की,भगवान बुद्धाच्या जीवन काळातील त्यांचा ‘जन्म’, त्यांची ‘ज्ञानप्राप्ती’ आणि त्यांचं ‘महापरिनिर्वा’ण या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेला झाल्यामुळं या पौर्णिमेला ‘बुद्ध पौर्णिमा’ असं म्हटलं जातं. हा दिवस म्हणजे अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो. जर बुद्ध या जगात जन्माला आले नसते, तर खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा, रूढी, परंपरा आजही चालूच राहिल्या असत्या.असेही ते म्हणाले.

कार्यक्रमास मंचावर भिक्खू संघासह भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो, भदंत पंयाबोधी थेरो, भन्ते पंयावंश, भन्ते पंयासार, भन्ते पंयावंत ,भन्ते पंयातीथ तसेच वसंतराव कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्रमणी,प्रा.निता गायकवाड प्रा.विलास खर्गखराटे,प्रकाश कांबळे यादवराव भवरे,उत्तम खंदारे,देवराव खंदारे,अशोक कांबळे,ॲड धम्मा जोंधळे दादाराव पंडित,ॲड हर्षवर्धन गायकवाड चक्रवर्ती वाघमारे,तुकाराम ढगे,मिलिंद कांबळे आदींची उपस्थित होते. यावेळी भबुद्धाच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून बुद्ध विहार येथे पंचशिल धम्मध्वजाचे ध्वजारोहण भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्याहस्ते करण्यात आले महावंदना भिक्खु संघाने घेतली. यावेळी रक्तदात शिबिर घेण्यात आले. यानंतर भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक शहराच्या मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. मिरवणुकीचा समारोप डॉ. आंबेडकर चौक येथे करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले आभार उत्तम खंदारे यांनी माणले. पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. यशस्वीतेसाठी बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे अतूल गवळी अमृत कऱ्हाळे राम भालेराव सुरज जोंधळे साहेबराव सोनवणे प्रविण कनकुटे कापूरे आदि प्रयत्न केले महावंदनेला बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या

You cannot copy content of this page