चोरट्यांचा महारुद्र हनुमान मंदीराच्या दानपेटीवर डल्ला

Spread the love

पांगरा रोडवरील बरबडी शिवारात अज्ञात चोरट्यांचा कारनामा;पुर्णा पोलीसांत घटनेची नोंद

पूर्णा ता.१९(प्रतिनिधी): तालूक्यातील पूर्णा-पांगरा रोडवर असलेल्या बरबडी शिवारातील महारुद्र मंदीरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना (ता.१९) आॅगस्ट मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे.दरम्यान, भाविकांनी चुडावा पोलिस ठाण्यात ग्रामस्थांनी तक्रार दिली आहे.

घटने बाबत अधिक माहिती असी की, पूर्णा तालूक्यातील बरबडी शिवारात पांगरा रोडलगत जागृत महारुद्र मंदीर देवस्थान आहे.येथील मंदीरातील लोखंडी दानपेटी १८ ऑगस्ट रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून दानपेटीतील हजारों रुपयांचे गुप्तधन लंपास केले आहे.मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.या आधी देखील दोनवेळा दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून आतील दान लंपास केले होते .दरम्यान, सदरील दानपेटी फोडून चोरी केल्याची घटना पाहिल्यावर बरबडी येथील भक्त तथा नागरीक ज्ञानदेव नारायण सोलव यांनी पोलिस पाटील राहुल सुर्यवंशी यांच्या समक्ष पूर्णा पोलीसात तक्रार दिली आहे.शिवाय, त्यांनी सदरील महारुद्र मंदिर येथे पोलीसांची रात्रीच्या राऊंडची पेट्रोलियम गाडीने गस्त घालावी अशी मागणी करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page