पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्डयात पडुन १० वर्षीय बालकाचा दुदैवी मृत्यू

Spread the love

पुर्णेतील हरी नगर भागातील घटना; ठेकेदाराच्या हलगर्जीपणा भोवला; पालीका पाणी पुरवठा अभियंता व ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात मागणी

पुर्णा ता.२९(प्रतिनिधी);प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसाठी नव्याने तयार करण्यात येणा-या पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्डयातील पाण्यात पडुन एका १० वर्षीय बालकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना पुर्णा शहरातील हरीनगर भागात (ता.२८) रोज गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले आहे. कंत्राटदाराकडुन सदरील टाकी बांधकामासाठी खोदलेल्या खड्डयास कोणत्याही सुरक्षात्मक उपाययोजना केल्या नसल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे.स्थानिक नागरिकांनी घटनेचा तीव्र संताप व्यक्त करत सदरील पाणी पुरवठा अभियंता तसेच ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.(Un fortunate death of a 10-year-old boy after falling into a pit dug for a water tank)
      विश्वदीप संतोष कांबळे (वय १०)वर्ष रा. नालंदा नगर, पूर्णा असं त्या मयत चिमुकल्या बालकांचे नांव आहे.सदरील बालक हा घरुन खेळण्यासाठी गेला होता.परंतु सायं ५ वाजल्यापासून तो बेपत्ता झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी पोलीसांना कळवले होते. पोलीसांनीही ही माहिती समाज माध्यमातून प्रकाशित केली होती.विश्वदीपचा शोध घेणा-या पोलीसांना गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास हरिनगर येथे पालीकेकडुन नव्याने तयार करण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकी बांधकामा साठी खोदलेल्या खड्डयात एका मुलाचा मृतदेह आढळून आला.Purna Police पो.नि.विलास गोबाडे, सपोनि गजानन पाटील, फौजदार प्रकाश इंगोले व आमेर चाऊस आदीं पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेत. त्याची शहानिशा केली असता तो मुलगा विश्वदीप कांबळे असल्याचे उघडकीस आले आहे.पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून विश्वदीप हा पित्याचे छत्र हरवलेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितील मोलमजुरी करणा-या कुटुंबातील मुलगा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुर्णा पालीकेच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेचा पहिला बळी.? 
   शहरातील पाणीपुरवठा योजना टाकी बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून १० वर्षीय विश्वदीप कांबळे याबालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, हा प्रकार पालीकेच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेचा पहिला बळी ठरला आहे.कंत्राटदाराने काम करताना सुरक्षा उपाययोजना करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. या हलगर्जी पणामुळेच निष्पाप जीव गेला असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला असून, जबाबदार पाणीपुरवठा अभियंता, ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page