भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या “जाहीर नागरी सत्काराचे” आयोजन

Spread the love

पूर्णा ता.२२(प्रतिनिधी);

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुध्द सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने मंगळवारी अखिल भारतीय भिक्खू संघ कार्याध्यक्ष भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या “जाहीर नागरी सत्काराचे” आयोजन करण्यात आले आहे.

भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो हे येथिल बौद्ध विहार संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्या संस्थेला राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, तसेच आंतरराष्ट्रीय विपस्सना केंद्र लेह-लडाख येथे जागतिक योग दिनानिमित्त “हिमालयन बोगा अवॉर्ड फॉर वर्ल्ड पिस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपगुप्त महाथेरो हे पूर्णा शहरामध्ये व परभणी जिल्ह्यामध्ये सामाजिक सद्भाव, शांतता व सुव्यवस्था प्रस्तापित करण्यासाठी मोठे योगदान राहीले आहे. याबद्दल पूर्णा वासियांच्या वतीने मंगळवारी २४ रोजी पूर्णा पालीकेच्या प्रांगणात दु १२:३० वाजता त्यांचा जाहीर नागरी सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी. नगराध्यक्ष उत्तमराव कदम, स्वाताध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. मोहनराव मोरे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.नंदकिशोर शिवाचार्य महाराज ,मौलाना शमिम अहमद रिजवीमा. वेदमूर्ती उमेश महाराज टाकळीकर हभप. सोपान काका बोबडे, फादर मायकल फ्रान्सिस ,मुदितानंद भिक्खू पंव्यावंश , तर प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे डॉ.विलास खर्गखराटे .प्रा.डॉ.निता गायकवाड, प्राचार्य डॉ. गणेश जोशी,मा.प्रकाश कांबळे हे उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्तमदादा खंदारे, अॅड. हर्षवर्धन गायकवाड, चक्रवर्ती वाघमारे, दादाराव पंडित, प्रवीण कनकुटे, गौतम दिपके, देवराव खंदारे, मनोज उबाळे, राजकुमार सूर्यवंशी, साहेबराव सोनवणे, दिलीप गायकवाड,,अमृत कराळे,चैतानंद वाघमारे, भिमा बावळे, उत्तम कापुरे, मोहन लोखंडे आदींसह बुद्ध विहार समीतीच्या वतीने करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page