वेदमूर्ती अवधूत महाराज टाकळीकर यांना काशी विश्वविद्याठाची मानद विद्यावाचस्पती पदवी प्रदान.

Spread the love

परभणी ता.17(प्रतिनिधी)
श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथील सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठानचे प्रधानाचार्य तसेच श्रीसद्गुरू वेंकटेश दाजीमहाराज संस्थानचे कार्यवाह वेदमूर्ती श्री.अवधूत उमेशमहाराज टाकळीकर यांना वाराणसी येथील काशी विश्वविद्यापीठाची अत्यंत प्रतिष्ठेची मानद विद्यावाचस्पती ही पदवी (मानद डॉक्टरेट) प्रदान करण्यात आली.

वैदिक क्षेत्रातील अत्युच्च सन्मान या निमित्ताने परभणी जिल्ह्याला प्राप्त झाला.श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथील सच्चिदानंद वेद प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेदमूर्ती श्री.अवधूत महाराज टाकळीकर यांनी गेल्या वीस वर्षापासून वेद प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेकडो मुलांना वेदाचे शिक्षण दिले आहे. यासोबतच महाराष्ट्रातील एक श्रीदासगणू परंपरेतील सुप्रसिद्ध नारदिय कीर्तनकार , वेदांतशास्त्र, आचार्य दर्शन व संतसाहित्याचे अभ्यासक, व्याख्याते, प्रवचनकार, श्रीमद् भागवत कथाकार, संतश्रेष्ठ श्रीसद्गुरु वेंकटेश दाजीमहाराज यांचे वंशज तसेच शिक्षा मंत्रालय द्वारा मान्यता प्राप्त ऋग्वेद परीक्षक म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. यासोबतच सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान व श्रीसद्गुरु वेंकटेश दाजीमहाराज संस्थान तसेच संत वर्य गंगाजी बापू महाराज गोसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बालसंस्कार वर्ग, धार्मिक – सामाजिक – सांस्कृतिक कार्यक्रमाचे ते वेळोवेळी आयोजन करत असतात. वेदमूर्ती श्री. अवधूतमहाराज हे पूर्व संस्थानाधिपती विख्यात संस्कृत पंडित कै.श्री.अनंत महाराज टाकळीकर यांचे नातू तसेच दाजीमहाराज संस्थानचे संस्थानाधिपती सुप्रसिद्ध वेदाचार्य श्री.उमेशमहाराज टाकळीकर यांचे सुपुत्र आहेत.

You cannot copy content of this page